शस्त्र अधिनियम १९५९
प्रकरण २ :
शस्त्रे व दारुगोळा यांचे संपादन, कब्जा, निर्मिती, विक्री, आयात, निर्यात व वाहतुक :
कलम ३ :
अग्निशस्त्रे व दारूगोळा संपादन करण्यासाठी व कब्जात ठेवण्यासाठी लायसन :
१) कोणतीही व्यक्ती, या अधिनियमाचे उपबंध व त्याखाली केलेले नियम यांच्या अनुसार याबाबतीत दिलेले लायसन तिने धारण केले नसल्यास कोणतेही अग्निशास्त्र किंवा दारूगोळा संपादन करणार नाही, स्वत:च्या कब्जात ठेवणार नाही किंवा बरोबर बाळगणार नाही;
परंतु, स्वत: लायसन धारण करत नसताना, एखाद्या व्यक्तीला लायसन धारकाच्या समक्ष किंवा त्याच्या लेखी प्राधिकरणान्वये कोणतेही अग्निशास्त्र किंवा दारूगोळा दुरूस्तीकरिता किंवा लायसनच्या नवीकरणाकरिता किंवा अशा धारकाच्या उपयोगाकरिता बरोबर बाळगता येईल.
२) पोटकलम १) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, पोटकलम ३) मध्ये निर्दिष्ट केलेल्या व्यक्तीखेरीज इतर कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही वेळी, तीनपेक्षा अधिक अग्निशस्त्रे संपादन करता येणार नाहीत, स्वत:च्या कब्जात ठेवता येणार नाहीत किंवा बरोबर बाळगता येणार नाहीत :
परंतु, शस्त्र (विशोधन) अधिनियम, १९८३ङ्क (१९८३ चा २५) याच्या प्रारंभी ज्या व्यक्तीच्या कब्जात तीनपेक्षा जास्त अग्निशस्त्रे असतील अशा कोणत्याही व्यक्तीला, अशा अग्निशस्त्रांपैकी कोणतीही तीन अग्निशस्त्रे स्वत:जवळ ठेवून घेता येतील आणि अशा प्रारंभापासून नव्वद दिवसांच्या आत त्या व्यक्तीला उर्वरित अग्निशस्त्रे सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याकडे किंवा कलम २१ च्या पोटकलम (१) च्या प्रयोजनार्थ विहित करण्यात आल्या असतील अशा शर्तीच्या अधीनतेने, लायसनधारक व्यापाराकडे किंवा अशी व्यक्ती ही संघराज्याच्या सशस्त्र सेनादलाची सदस्य असेल अशा बाबतीत, पथक शस्त्रागारामध्ये ती निक्षिप्त करावी लागतील.
३) पोटकलम (२) मध्ये अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट, अग्निशस्त्रांच्या कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा केंद्र शासनाने लायसन दिलेल्या किंवा मान्यता दिलेल्या रायफल क्लबचा किंवा रायफल संघाचा जो कोणताही सदस्य नेमबाजीच्या सरावासाठी पॉर्इंट २२ बोअर रायफल किंवा हवाई रायफल वापरत असेल त्याला लागू होणार नाही.
४) कलम २१ ची पोटकलमे (२) ते (६) (दोन्ही धरून) यांचे उपबंध, हे त्या कलमाच्या पोटकलम (१) खाली निक्षिप्त केलेल्या कोणत्याही शस्त्राला किंवा दारूगोळ्याला असे लागू होतात तसेच ते, पोटकलम (२) च्या परंतुकाखाली निक्षिप्त केलेल्या कोणत्याही अग्निशस्त्रांच्या संबंधात लागू होतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.