शस्त्र अधिनियम १९५९
कलम ३७
अटक व झडत्या :
या अधिनियमात अन्यथा उपबंधित केले असेल ते खेरीजकरून,-
क) या अधिनियमानुसार किंवा त्याअन्वये केलेल्या नियमांखाली केलेल्या सर्व अटका व झडत्या यांची तामिली (फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३) (१९७४ चा २) यातील जे संबंध त्या संहितेखाली केलेल्या अनुक्रमे अटकांच्या व झडत्यांच्या संबंधी असतील त्या उपबंधांनुसार करण्यात येईल;
ख) दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी नसलेल्या अशा व्यक्तीने या अधिनियमानुसार अटक केलेली कोणतीही व्यक्ती व हस्तगत केलेली कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याकडे विनाविलंब सुपूर्द करण्यात येईल आणि तो अधिकारी -
एक) दंडाधिकाऱ्यासमोर हजर होण्यासाठी त्या व्यक्तीने जामीनदारांसह किंवा त्यांच्याविना बंधपत्र निष्पादित केल्यावर त्या व्यक्तीस सोडून देईल आणि त्या सक्तीने ताब्यात घेतलेल्या वस्तू, ती व्यक्ती दंडशधिकाऱ्यासमोर हजर होईपर्यंत आपल्या अभिरक्षेत ठेवील, किंवा
दोन) त्या व्यक्तीने बंधपत्र निष्पादित करण्याच्या कामी आणि आवश्यक करण्यात आल्यास पुरेसे जामीनदार प्रस्तुत करण्याच्या कामी कसूर केली तर, ती व्यक्ती व त्या वस्तू दंडाधिकाऱ्यासमोर विनाविलंब हजर करील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.