महाराष्ट्र (मुबंई) दारूबंदी (वैद्यकीय तपासणी व रक्त परीक्षा) नियम १९५९
नियम २
व्याख्या :
या नियमांमध्ये, विषय किंवा संदर्भ यांस प्रतिकूल असे काहीही नसल्यास;
१) अधिनियम
याचा अर्थ, महराष्ट्र दारूबंदी अधिनियम, असा आहे;
२) नमुना
याचा अर्थ, या नियमांना जोडलेला नमुना, असा आहे,
३) दारूबंदी अधिकारी
याचा अर्थ, अधिनियमाच्या कलम १२९-अ चे पोट-कलम (५) खाली राज्य शासनाने यथायोग्य रीतीने अधिकारी दिलेला दारूबंदी अधिकारी, असा आहे;
४) नोंदलेला वैद्यक व्यवसायी
याचा अर्थ, अधिनियमाच्या कलम १२९-अ चे पोट-कलम (१) किंवा पोट-कलम (४) खाली राज्य शासनाने सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे प्राधिकार दिलेला कोणातही नोंदलेला वैद्यक व्यवसायी असा आहे;
५) परीक्षण अधिकारी
याचा अर्थ, शासनाचा रासायनिक परीक्षक किंवा सहायक रासायनिक परीक्षक अथवा अधिनियमाच्या कलम १२९-अ च्या पोट-कलम (१) खाली रक्ताची परीक्षा करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेला इतर कोणताही अधिकारी, असा आहे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.