महाराष्ट्र (मुबंई) दारूबंदी (वैद्यकीय तपासणी व रक्त परीक्षा) नियम १९५९
नियम ३
वैद्यकीय तपासणी :
एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने किंवा दारूबंदी अधिकाऱ्याने एखाद्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्याच्या किंवा तिचे रक्त घेण्याच्या प्रयोजनासाठी अशा व्यक्तीला अधिनियमाचे कलम १२९-अ, पोट-कलम (१) खाली ज्याच्यासमोर हजर असेल त्या नोंदलेला वैद्यक व्यवसायीने अशा व्यक्तीची तपासणी केली पाहिजे आणि त्याला आवश्यक वाटल्यास, या नियमांत ठरवून दिलेल्या रीतीने अशा व्यक्तीचे रक्त घेऊन ते रक्त, ज्या अधिकाऱ्याने अशा व्यक्तीला हजर केले होते त्याच्याकडे पाठवले पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याला, तपासणीचा निष्कर्ष दिलेला नमुना (अ) मधील प्रमाणपत्र दिले पाहिजे व अशा प्रमाणपत्राची एक प्रत स्वत:च्या रेकॉर्डसाठी (दप्तरासाठी) ठेवली पाहिजे. (येथे रक्त घेणे म्हणजे रक्ताचा नमुना घेणे).
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.