महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १२० :
जाणून-बुजून अतिक्रमण करणे:
जी कोणी व्यक्ती समाधानकारक सबबीवाचून, कोणतेही राहण्याचे घर किंवा जागा किंवा त्याला जोडलेली कोणतीही जमीन किंवा भूमी यात किंवा यावर किंवा शासनाच्या मालकीची किंवा सार्वजनिक कारणांसाठी उपयोग करण्यासाठी राखून ठेवलेली कोणतीही जागा, इमारत, स्मारक किंवा बांधकाम यांवर किंवा होडी किंवा जहाज यांवर जाणूनबुजून प्रवेश करील किंवा राहील, मग त्याजकडून वस्तुत: कोणतेही नुकसान झालेले असो वा नसो, तीस, अपराधसिद्धीनंतर १(पाच हजार रुपयांपर्यंतची) दंडाची शिक्षा होईल.
*१- २००० चा महा. अधिनियम क्र. ४० कलम १८ ते २० द्वारे घातला.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.