महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ इ :
पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ :
१) राज्य शासन, राजपत्रातील अधिसुचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ या नावाने संबोधले जाणारे एक मंडळ घटित करील.
२) पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल :-
अ) पोलीस महासंचालक व महानिरीक्षक - अध्यक्ष ;
ब) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग - सदस्य;
क) पोलीस आयुक्त, मुंबई - सदस्य;
ड) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) - सदस्य;
इ) सचिव किंवा यथास्थिति, प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) - सदस्य;
फ) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (आस्थापना) - सदस्य-सचिव :
परंतु, उपरोक्त सदस्यांपैकी एकही सदस्य मागासवर्गातील नसेल तर, राज्य शासन, अशा प्रवर्गातील, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक या दर्जाच्या अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करील.
स्पष्टीकरण :
या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ, मागास वर्ग या शब्दप्रयोगाचा अर्थ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग, असा आहे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.