महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ फ :
पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ ची कार्य :
पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ पुढील कार्ये पार पाडील :-
१) या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, कलम २२इ च्या पोट-कलम (१) अन्वये घटित केलेल्या मंडळास, वेतन व भत्ते वगळून, पोलीस अधिकाऱ्यांच्या सेवाशर्ती संबंधात, संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे उचित शिफारशी करता येतील. संबंधित सक्षम प्राधिकरण हे, सामान्यत: त्याप्रमाणे कृती करील.
२) विशेषत: आणि पूर्वगामी कार्याच्या सर्वसाधारणतेला बाध न आणता, मंडळाला, पुढील कार्यांपैकी सर्व किंवा कोणतीही कार्य पार पाडता येतील :-
अ) पोलीस अधिकाऱ्यांची पदस्थापना व बदली यासंबंधात निर्णय घेणे;
ब) पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शिस्तभंगविषयक कार्यवाही आणि सेवाविषयक इतर बाबी यासंबंधात त्यांच्याकडून उक्त मंडळाला प्राप्त झालेल्या गाèहाण्यांच्या बाबतीत, संबंधित सक्षम प्राधिकरणाला उचित शिफारशी करणे;
क) मंडळ, राज्य शासनाकडून मंडळाला वेळोवेळी नेमून देण्यात येतील अशी इतर कार्ये पार पाडील.
३) खंड (१) व (२) यांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, राज्य शासनाला, पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधातील पदस्थापना, बदल्या व शिस्तभंगविषयक बाबी याबाबतीत जनहिताच्या व प्रशासकीय निकडीच्या दृष्टीने वेळोवेळी निदेश देता येतील व असे निदेश मंडळावर बंधनकारक राहतील.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, पोलीस अधिकारी या शब्दप्रयोगाचा अर्थ, पोलीस निरीक्षक या दर्जाचा आणि या दर्जापेक्षा कमी दर्जाचा असेल असा पोलीस अधिकारी, असा आहे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.