महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ जे-१ :
जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :
१) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ म्हणून संबोधण्यात येणारे एक मंडळ घटीत करील.
२) जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल :-
अ) जिल्हा पोलीस अधीक्षक - अध्यक्ष;
ब) वरिष्ठतम अपर पोलीस अधीक्षक - सदस्य;
क) पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) - सदस्य-सचिव;
परंतु, उपरोक्त सदस्यांपैकी एकही सदस्य मागासवर्गातील नसेल तर, जिल्हा पोलीस अधीक्षक, अशा प्रवर्गातील, पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या एका अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करील.
स्पष्टीकरण :
या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ, मागासवर्ग या शब्दप्रयोगाचा अर्थ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास-वर्ग असा आहे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.