महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ जे-२ :
जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :
जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील कार्ये पार पाडील :-
अ) हे मंडळ, जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक या दर्जाच्या पोलीस कर्मचारीवर्गाच्या सर्व बदल्या, पदस्थापना या बाबी निर्णीत करील.
ब) मंडळास, जिल्ह्याबाहेर पदस्थापना व बदल्या करण्यासंबंधात पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ याला उचित शिफारशी करण्यासाठी प्राधिकृत केलेले असेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, पोलीस कर्मचारीवर्ग या शब्दप्रयोगाचा अर्थ, पोलीस निरीक्षक दर्जाचा पोलीस कर्मचारीवर्ग, असा आहे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.