कलम ६३-ब : ग्राम संरक्षक पथकाची रचना :
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
चार : ग्राम संरक्षक पथके :
कलम ६३-ब :
ग्राम संरक्षक पथकाची रचना :
१) गावातील व्यक्तींच्य संरक्षणासाठी, मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी (अधीक्षकास), त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे, त्याच्या अधिकारितेतील कोणत्याही गावाकरिता स्वेच्छा संस्थांची (ज्यास या कलमात यापुढे ग्राम संरक्षक पथके असे म्हटले आहे) रचना करता येईल.
२) राज्य शासन याबाबत जे कोणतेही सामान्य किंवा विशेष आदेश देईल त्यास अधीन राहून, २० आणि ५० या वर्षांच्या दरम्यान वय असलेली आणि गावात राहणारी आणि जी, (अधीक्षकाच्या) मते, या कलमाच्या उपबंधांन्वये पार पाडावयाच्या कर्तव्यांचे आणि कामांचे स्वरुप लक्षात घेता, लायक आणि योग्य व्यक्ती आहे अशी प्रत्येक व्यक्ती तिच्या गावासाठी रचना करण्यात आलेल्या ग्राम संरक्षक पथकाचा सदस्य म्हणून नेमणूक केली जाण्यास पात्र असेल.
३) (अधीक्षकास) स्वत: सही केलेल्या आणि स्वत:ची मुद्रा वठविलेल्या लेखी आदेशावरुन, पोट-कलम (२) अन्वये पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीची ग्राम संरक्षक पथकाचा सदस्य म्हणून नेमणूक करता येईल.
४) (अधीक्षक) प्रत्येक ग्राम संरक्षक पथकासाठी पोट-कलम (२) अन्वये पात्र असलेल्या व्यक्तींची, कोतवाल या नावाने ओळखण्यात येणारा मानसेवी समादेशक म्हणून नेमणूक करील.
५) तालुक्यातील ग्राम संरक्षक पथकांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी,(अधीक्षकास) हवालदाराच्या दर्जाहून कमी नाही अशा दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यास तालुका ग्राम संरक्षक अधिकारी म्हणून, आणि जी कोणतीही व्यक्ती काम करण्यास राजी असेल आणि जी (अधीक्षकाच्या) मते लायक असेल त्या कोणत्याही व्यक्तीस संयुक्त तालुका ग्राम संरक्षक अधिकारी म्हणून नेमता येईल.
६) (अधीक्षकास) जिल्हयातील ग्राम संरक्षक पथकाच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यावर देखरेख करण्यासाठी, फौजदाराच्या दर्जाहून कमी नाही अशा दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यास जिल्हा ग्राम संरक्षक अधिकारी म्हणून, आणि जी कोणतीही व्यक्ती काम करण्यास उत्सुक असेल आणि जी (अधीक्षकाच्या) मते लायक असेल त्या कोणत्याही व्यक्तीस संयुक्त जिल्हा ग्राम संरक्षक अधिकारी म्हणून नेमता येईल.
७) या कलमान्वये नेमलेले ग्राम संरक्षक पथकाचे सदस्य आणि अधिकारी हे (अधीक्षकाच्या) मार्गदर्शनाखाली व नियंत्रणाखाली असतील आणि त्यास (अधीक्षक) ठरवील त्याप्रमाणे प्रशिक्षण मिळेल व ते अशी कर्तव्ये पार पाडतील.
८) या कलमान्वये नेमलेले ग्राम संरक्षक पथकाचे सदस्य आणि (पोलीस अधिकारी खेरीजकरुन इतर) अधिकारी हे (अधीक्षक) राज्य शासनाची आगाऊ मान्यता घेऊन ठरवील अशा नोकरीच्या अटीस व शर्तीस पात्र असतील.
९) (अधीक्षकास) किंवा या कलमान्वये नेमलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास कोणत्याही वेळी, त्याच्या अधीन असलेल्या अधिकाऱ्यास, किंवा ग्राम संरक्षक पथकाच्या कोणत्याही सदस्यास प्रशिक्षण देण्यासाठी किंवा त्यास नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडण्यासाठी बोलावता येईल.
१०) या कलमान्वये नेमलेल्या ग्राम संरक्षक पथकाच्या प्रत्येक सदस्यास व प्रत्येक अधिकाऱ्यास-
अ) त्याची नेमणूक झाल्यानंतर, राज्य शासनाने यासंबंधात मान्य केलेल्या नमुन्यात एक प्रमाणपत्र मिळेल;
ब) कर्तव्य बजावण्यासाठी बोलाविण्यात आले असता, या अधिनियमान्वये नेमलेल्या पोलीस अधिकाऱ्यास असतात त्याचप्रमाणे शक्ती व विशेष हक्क असतील व संरक्षण मिळेल.
११) त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही विधीत कोणताही मजकूर असला तरी या कलमान्वये नेमलेल्या ग्राम संरक्षक पथकाचा सदस्य किंवा (पोलीस अधिकारी खेरीजकरुन इतर) कोणताही अधिकारी, तो ग्राम संरक्षक पथकाचा सदस्य किंवा असा अधिकारी आहे एवढ्याच कारणाकरिता-
अ) (महाराष्ट्र) विधानपरिषदेचा, किंवा
ब) कोणत्याही स्थानिक प्राधिकारी संस्थेचा सदस्य म्हणून निवडला जाण्यास किंवा असण्यास अपात्र असणार नाही.
१२) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा जिल्ह्यात मुंबई नगर सेना अधिनियम, १९४७, अन्वये नेमलेल्या महासमादेशक निदेश देईल अशा नगर सेनेच्या अधिकाऱ्यांनी (अधीक्षक), जिल्हा गआम संरक्षक अधिकारी व तालुका ग्राम संरक्षक अधिकारी याच्या या कलमाखालील शक्तींचा वापर केल पाहिजे. तसेच त्यांनी त्यांची कर्तव्य बजावली पाहिजेत व कामे पार पाडली पाहिजेत आणि त्यानंतर य कलमाचे सर्व पूर्ववर्ती उपबंध लागू होतील, परंतु त्यांतील(अधीक्षक) जिल्हा ग्रामसंरक्षक अधिकारी व तालुका ग्राम संरक्षक अधिकारी, यासंबंधीचे निर्देश हे नगर सेनेच्या संबंधित अधिकाऱ्यांचेच निर्देश आहेत असे समजण्यात येईल.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.
No feedback yet
Form is loading...