भारताचे संविधान ( राज्यघटना ) :
अनुच्छेद ३७८ :
लोकसेवा आयोगासंबंधी तरतुदी :
(१) या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी पद धारण करत असलेले डोमिनिअन ऑफ इंडियाच्या लोकसेवा आयोगाचे सदस्य त्यांनी अन्य पर्याय निवडलेला नसल्यास, अशा प्रारंभानंतर, संघराज्याच्या लोकसेवा आयोगाचे सदस्य होतील आणि अनुच्छेद ३१६ च्या खंड (१) व (२) मध्ये काहीही असले तरी, मात्र त्या अऩुच्छेदाच्या खंड (२) च्या परंतुकाला अधीन राहून, अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी अशा सदस्यांना जे लागू होते त्या नियमांन्वये ठरवण्यात आल्याप्रमाणे त्यांचा पदावधी संपेपर्यंत ते नियमितपणे पद धारण करण्याचे चालू ठेवतील.
(२) या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी पद धारण करत असलेले एखाद्या प्रांताच्या लोकसेवा आयोगाचे किंवा एखाद्या प्रांतसमूहाच्या कामांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या लोकसेवा आयोगाचे सदस्य, त्यांनी अन्य पर्याय निवडलेला नसल्यास, अशा प्रारंभानंतर, तेथील संबंधित राज्याच्या लोकसेवा आयोगाचे सदस्य किंवा यथास्थिति, तेथील संबंधित राज्यांच्या कामांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या संयुक्त राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य होतील आणि अनुच्छेद ३१६ च्या खंड (१) व (२) मध्ये काहीही असले तरी, मात्र त्या अनुच्छेदाच्या खंड (२) च्या परंतुकाला अधीन राहून, अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी अशा सदस्यांना जे लागू होते त्या नियमांन्वये ठरवण्यात आल्याप्रमाणे त्यांचा पदावधी संपेपर्यंत ते नियमितपणे पद धारण करण्याचे चालू ठेवतील.
#Indian Constitution Article 378 in Marathi
#Constitution of India Marathi article 378 .
For Full Access Purchase Paid MemberShip : Price -150 / Yearly.
संपूर्ण अॅक्सेस साठी पेड मेंबर व्हा.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.