भारताचे संविधान ( राज्यघटना ) :
परिशिष्ट ३ :
१.(संविधानाच्या अनुच्छेद ३७० (३) खालील घोषणा)
सी. ओ. २७३
भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३७० च्या खंड (३) तसेच अनुच्छेद ३७० च्या खंड (१) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, राष्ट्रपति, संसदेच्या शिफारशीवरुन अशी घोषणा करीत आहे की, ६ ऑगस्ट २०१९ पासून, उक्त अनुच्छेद ३७० चे सर्व खंड अमलांत असल्याचे समाप्त होईल, निम्नलिखित गोष्टींखेरीज करुन, अर्थात :-
३७०. वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे, या संविधानाच्या सर्व तरतुदी, कोणत्याही फेरबदलांशिवाय किंवा अपवादांशिवाय, या संविधानाच्या अनुच्छेद १५२ किंवा अनुच्छेद ३०८ किंवा अन्य कोणत्याही अनुच्छेदामध्ये अथवा जम्मू व काश्मीरच्या संविधानाच्या अन्य कोणत्याही तरतुदींमध्ये किंवा कोणताही कायदा, दस्तऐवज, न्यायनिर्णय, अध्यादेश, आदेश, उपविधि, नियम, विनियम, अधिसूचना, भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्याचा अंमल असलेली रुढी किंवा प्रथा किंवा अनुच्छेद ३६३ अन्वये कल्पिलेला अन्य कोणताही संलेख, संधी किंवा करार किंवा अन्यथा यांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जम्मू काश्मीर राज्यास लागू असतील.)
-------
१. विधि व न्याय मंत्रालय, विधायी विभाग आदेश क्रमांक सा.का.नि ५६२ (अ), दिनांक ६ ऑगस्ट २०१९, भारताचे राजपत्र, असाधारण, भाग २, खंड ३, उपखंड (१) मध्ये प्रकाशित.
#IndianConstitutionAppendix3Marathi
#ConstitutionIndiaMarathiAppendix3
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.