भारताचे संविधान ( राज्यघटना ) :
१.(बारावी अनुसूची :
(अनुच्छेद २४३ब)
नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या :
१) नगर नियोजनासह नागरी क्षेत्र विनियोजन.
२) जमिनींच्या वापराचे व इमारतींच्या बांधकामाचे विनियमन.
३) आर्थिक व सामाजिक विकासासाठी नियोजन.
४) रस्ते व पूल.
५) घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक प्रयोजनार्थ पाणीपुरवठा.
६) सार्वजनिक आरोग्य, स्वच्छताविषयक निगराणी व घन कचरा व्यवस्थापन.
७) अग्निशमन सेवा.
८) नागरी वनीकरण, पर्यावरणाचे संरक्षण व परिस्थितिकीय घटकांचे प्रवर्धन.
९) अपंग व मतिमंद यांच्यासह समाजीतील दुर्बल घटकांच्या हितसंबंधाचे संरक्षण करणे.
१०) गलिच्छ वस्ती सुधारणा व तिचा दर्जा उंचावणे.
११) नागरी क्षेत्रातील दारिद्रय कमी करणे.
१२) उपवने, उद्याने, क्रीडांगणे यांसारख्या नागरी सोयी व सुविधांची तरतूद करणे.
१३) सांस्कृतिक, शैक्षणिक व कलात्मक दृष्टीकोनाचे प्रवर्धन.
१४) दफन व दफनभूमी; दहन, दहनभूमी; व विद्युत दाहिनी.
१५) गुरांचा कोंडवाडा, पशुंवरील अत्याचाराला प्रतिबंध करणे.
१६) जीवनविषयक आकडेवारी, जन्म व मृत्यु नोंदणीसह.
१७) सार्वजनिक सुविधा, रस्त्यावरील दिवाबत्ती, वाहनतळे, बसथांबे व सार्वजनिक सोयींसह.
१८) कत्तलखाने व कातडी कमावण्याचे कारखाने यांचे विनियमन.)
--------
१. संविधान (चौऱ्याहत्तरावी सुधारणा) अधिनियम १९९२ याच्या कलम ४ द्वारे जादा दाखल केली (१ जून १९९३ रोजी व तेव्हापासून).
#IndianConstitutionSchedule12Marathi
#ConstitutionIndiaMarathiSchedule12
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.