फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
कलम ४७८ :
कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या कार्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार :
एखाद्या राज्याच्या विधानसभेने ठरावाद्वारे तशी परवानगी दिल्यास, राज्यशासन उच्च न्यायालयाशी विचारविनियम करून अधिसूचनेद्वारे असे निदेशित करू शकेल की, कलम १०८, १०९, ११०, १४५ आणि १४७ यांमधील कार्यकारी दंडाधिकऱ्यासंबंधीचे निर्देश म्हणजे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यासंबंधीचे निर्देश होत असा त्याचां अर्थ लावण्यात यावा.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.