फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
कलम ४८४ :
निरसन व व्यावृत्ती :
१) फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ (१८९८ चा ५ ) याद्वारे निरसित झाली आहे.
२) असे निरसन झाले असले तरीही,-
अ) ही संहिता जेव्हा अमलात येणार त्या दिनांकाच्या निकटपूर्वी जर कोणतेही अपील, अर्ज, संपरीक्षा, चौकशी किंवा अन्वेषण प्रलंबित असेल तर, प्रकरणपरत्वे, असे अपील, अर्ज संपरीक्षा, चौकशी किंवा अन्वेषण जणू काही ही संहिता अंमलात आलेली नसावी त्याप्रमाणे अशा प्रारंभाच्या निकटपूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ (१८९८ चा ५) (यात यानंतर जुनी संहिता म्हणून निर्दिष्ट) जशी अमलात होती तिच्या उपबंधांनुसार निकालात काढले जाईल, चालू ठेवण्यात येईल किंवा करण्यात येईल.
परंतु जुन्या संहितेच्या १८ व्या प्रकरणाखालील जी जी चौकशी या संहितेच्या प्रारंभाच्या वेळी प्रलंबित असेल ती प्रत्येक चौकशी या संहितेच्या उपबंधांनुसार केली जाईल व निकालात काढली जाईल;
ब) जुन्या संहितेखाली प्रकाशित केलेल्या अधिसुचना, काढलेल्या उद्घोषणा, प्रदान केलेले अधिकार, विहित केलेले नमुने, निश्चित केलेल्या स्थानिक अधिकारिता, दिलेले शिक्षादेश व आदेश, केलेले नियम आणि केलेल्या नियुक्ती (विशेष दंडाधिकारी म्हणून नव्हे) हे या संहितेच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी अमलात असेल ते ते सर्व या संहितेच्या समनुरूप उपबंधाखाली अनुक्रमे प्रकाशित केलेले, काढलेले, प्रदान केलेले, विहित केलेले, व्याख्या केलेले, दिलेले व केलेले असल्याचे मानले जाईल;
क) जुन्या संहितेखाली दिलेल्या कोणत्याही मंजुरीच्या किंवा संमतीच्या अनुरोधाने व्हावयाची कोणतीही कार्यवाही त्या संहितेखाली सुरू झालेली नसेल तर, ती मंजुरी किंवा संमती या संहितेच्या समनुरूप उपबंधांखाली दिली असल्याचे मानले जाईल आणि अशा मंजुरीच्या किंवा संमतीच्या अनुरोधाने या संहितेखाली कार्यवाही सुरू करता येईल;
ड) जुन्या संहितेचे उपबंध सविधानाच्या ३६३ व्या अनुच्छेदाच्या अर्थांतर्गत संस्थानधिपती असलेल्या व्यक्तीविरूद्ध गुदरलेल्या प्रत्येक खटल्याच्या संबंधात लागू असल्याचे चालू राहील.
ड) जुन्या संहितेचे उपबंध संविधानाच्या ३६३ व्या अनुच्छेदाच्या अर्थांतर्गत संस्थानधिपती असलेल्या व्यक्तीविरूद्ध गुदरलेल्या प्रत्येक खटल्याच्या संबंधात लागू असल्याचे चालू राहील.
३) एखाद्या अर्जासाठी किंवा अन्य कार्यवाहीसाठी जुन्या संहितेखाली विहित केलेली मुदत या संहितेच्या प्रारंभी किंवा तत्पूर्वी संपली असेल तर, या संहितेने त्यासाठी त्याहून आहेत, एवढ्याच कारणाने, या संहितेतील कोणत्याही गोष्टीचा अर्थ, त्यामुळे संहितेखाली असा कोणताही अर्ज करणे किंवा कार्यवाही सुरू करणे शक्य आहे असा लावला जाणारा नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.