पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६
कलम २५ :
नियम करण्याची शक्ती :
(१) केंद्र सरकार या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्याकरिता, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल.
(२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, अशा नियमांद्वारे पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींकरिता उपबंध करता येतील, त्या बाबी अशा :
(क) कलम ७ अन्वये, ज्या मानकांपेक्षा अधिक प्रमाणात प्रदूषके विसर्जित किंवा उत्सर्जित केली जाता कामा नये, ती मानके;
(ख) ज्या कार्यपद्धतीनुसार आणि ज्या संरक्षक तरतुदींचे अनुपालन करून, कलम ८ अन्वये, जोखमीचे पदार्थ हाताळले जातील किंवा हाताळले जाण्याची व्यवस्था करता येईल ती कार्यपद्धती व त्या संरक्षक तरतुदी;
(ग) कोणत्याही पर्यावरणी प्रदूषकाचे, विहित मानकांपेक्षा अधिक प्रमाणात उत्सर्जन होत आहे किंवा होत असल्याची आशंका आहे या वस्तुस्थितीची सूचना ज्यांना देण्यात आली पाहिजे तसेच कलम ९ च्या पोटकलम (१) अन्वये ज्याच्यावर सर्व साहाय्य देण्याची बांधिलकी आहे अशी प्राधिकरणे किंवा अभिकरणे;
(घ) कलम ११ च्या पोटकलम (१) अन्वये हवा, पाणी, माती किंवा इतर पदार्थ यांचे नमुने विश्लेषणाकरिता ज्या रीतीने घेता येतील ती रीत;
(ङ) कलम ११ च्या पोटकलम (३) च्या खंड (क) अन्वये नमुन्यांचे विश्लेषण करवून घेण्याच्या हेतूची नोटीस ज्या नमुन्यात बजावण्यात येईल तो नमुना;
(च) पर्यावरणी प्रयोगशाळेची कार्ये हवा, पाणी, माती आणि इतर पदार्थ यांचे नमुने विश्लेषणाकरिता किंवा चाचणीकरिता अशा प्रयोगशाळेकडे सादर करण्याची कार्यपद्धती; प्रयोगशाळेच्या अहवालाचा नमुना; अशा अहवालाकरिता द्यावयाची फी आणि अशा प्रयोगशाळेला तिची कलम १२ च्या पोटकलम (२) खालील कामे पार पाडणे शक्य व्हावे यासंबंधीच्या इतर बाबी;
(छ) हवा, पाणी, माती किंवा इतर पदार्थांच्य नमुन्यांचे विश्लेषण करण्याच्या प्रयोजनाकरिता कलम १३ अन्वये नियुक्त करण्यात किंवा मान्यता देण्यात आलेल्या शासकीय विश्लेषकाच्या अर्हता;
(ज) कलम १९ च्या खंड (ख) अन्वये, अपराधाची नोटीस, आणि केंद्र सरकारकडे तक्रार करण्याच्या उद्देशाची नोटीस ज्या रीतीने देण्यात येईल ती रीत;
(झ) कलम २० अन्वये कोणतेही अहवाल, विवरणे, आकडेवारी, लेखे आणि अन्य माहिती ज्यास पुरविण्यात येईल असे प्राधिकरण किवा अधिकारी;
(त्र) जी विहित करणे आवश्यक आहे किंवा करता येईल अशी अन्य कोणतीही बाब.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.