भारतीय दंड संहिता १८६० मराठी : (IPC 1860 Marathi)
प्रकरण ११ :
खोटा पुरावा आणि सार्वजनिक (लोक) न्यायाच्या विरोधी अपराधांविषयी :
कलम २२५-अ :
ज्यासाठी अन्यथा तरतूद केलेली नाही अशा प्रकरणात, लोकसेवकाने अटक करण्याचे टाळणे किंवा पळून जाऊ देणे :
अपराधाचे वर्गीकरण :
शिक्षा :३ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
शिक्षा :२ वर्षाचा साधा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी
जो कोणी लोकसेवक असून, कलम २२१,२२२,२२३ यामध्ये किंवा त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यामध्ये ज्यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही, अशा कोणत्याही प्रकरणामध्ये, एखाद्या व्यक्तीला अटक करण्यास किंवा बंदिवासात ठेवण्यास तो लोकसेवक कायद्याने बांधलेला असतो. असे असताना त्या व्यक्तीला अटक करण्याचे टाळेल अगर तिला बंदिवासामधून पळून जाऊ देईल त्याला -
अ)त्याने तसे उद्देशपूर्वक केले तर, तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका प्रकारची कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील; आणि
ब)जर त्याने तसे हयगयीने केले असेल तर, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.