माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००
कलम ७२ :
विश्वासार्हतेचा आणि गुप्ततेचा भंग :
या अधिनियमात किंवा त्यावेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरीही, हा अधिनियम किंवा त्या अन्वये तयार करण्यात आलेले नियम किंवा विनियम याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही अधिकारांनुसार कोणतेही इलेक्ट्रॉनिक अभिलेख (रेकॉर्ड), पुस्तक, नोंदवही, पत्रव्यवहार, माहिती, दस्तऐवज किंवा इतर सामग्रीमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने संबंधित व्यक्तीच्या संमतीशिवाय असे इलेक्ट्रॉनिक अभिलेख, पुस्तक, नोंदवडी, पत्रव्यवहार, माहिती, दस्तऐवज किंवा इतर माहिती इतर कोणत्याही व्यक्तीला दिली तर ती (माहिती देणारी) व्यक्ती दोन वर्षापर्यंतच्या मुदतीच्या कारावासाच्या किंवा एक लाक रूपयांपर्यंतच्या दंडाच्या किंवा या दोन्ही शिक्षांस पात्र ठरेल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.