बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०००
कलम ४२ :
बालक संगोपन :
१) ज्यांना अंतिमरित्या दत्तक द्यावयाचे आहे त्या अर्भकांना तात्पुरते ठेवण्याकरिता बालक संगोपन ही संज्ञा वापरण्यात येईल.
२) बालक संगोपनात परिस्थितिनुरुप बालकाला कमी अधिक कालावधीसाठी दुसऱ्या कुटुंबात ठेवण्यात येईल, जेथे मुलाचे स्व:चे पिता किंवा माता नियमितपणे भेट देऊ शकतील आणि परिणामी पुनर्वसनानंतर ती मुले त्यांच्या स्वत:च्या घरी परत जाऊ शकतील.
३) राज्य शासनाला मुलांच्या बालक संगोपन कार्यक्रमाच्या योजना पार पाडण्याच्या प्रयोजनासाठी नियम करता येतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.