बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०००
कलम ६१ :
निधी :
१) या अधिनियमान्वये ज्या बालकांवर किंवा मुलांवर कार्यवाही करण्यात येते त्यांच्या कल्याणासाठी व पुनर्वसनासाठी, राज्य शासन किंवा स्थानिक प्राधिकरण, त्यास योग्य वाटेल अशा नावाचा एक निधी निर्माण करील.
२) कोणत्याही व्यक्तीने किंवा संघटनेने स्वेच्छेने दिलेल्या अशा देणग्या, अंशदाने किंवा वर्गण्या या निधीमध्ये जमा करण्यात येतील.
३) पोटकलम (१) अन्वये उभारण्यात आलेल्या निधीचे प्रशासन, राज्य सल्लागार मंडळाकहून विहित करण्यात येईल अशा रीतीने आणि अशा प्रयोजनांसाठी करण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.