महाराष्ट्र प्राणिरक्षण अधिनियम १९७६
कलम १६ :
नियम तयार करण्याचा अधिकार :
(१) राज्य शासनास, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे व पूर्वप्रसिद्धीच्या शर्तीस अधीन राहून, नियम तयार करता येतील.
(२) विशेषकरून आणि पूर्वगामी तरतुदींच्या सर्वसाधारणतेस बाध येऊ न देता, अशा नियमात पुढील गोष्टींसाठी तरतूद करता येईल, -
(क) कलम ६ खालील प्रमाणपत्राचा नमुना,
(ख) अशा प्रमाणपत्रासाठी द्यावयाच्या फीची रक्कम,
(ग) कलम १४ खालील कोणत्याही अनुसूचित प्राण्यास ज्या शर्तींच्या अधीन राहून, अधिनियम लागू होणार नाही त्या शर्ती,
(घ) विहित केलेली किंवा विहित करण्यात येईल अशी इतर कोणतीही बाब.
(३) या अधिनियमान्वये तयार करण्यात आलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाचे अधिवेशन चालू असताना, एकाच अधिवेशनात किंवा लागोपाठच्या दोन अधिवेशनांत, एकूण तीस दिवसांची होईल इतक्या मुदतीकरिता, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल आणि ज्या अधिवेशनात तो अशा रीतीने ठेवण्यात आला असेल ते अधिवेशन किंवा त्याच्या लगतनंतरचे अधिवेशन समाप्त होण्यापूर्वी त्या नियमात कोणताही फेरबदल करण्यास दोन्ही सभागृहे संमत होतील किंवा नियम करू नये म्हणून दोन्ही सभागृहे संमत होतील व असा निर्णय राजपत्रात अधिसूचित करतील तर, अशा अधिसूचनेच्या दिनांकापासून, यथास्थिती, अशा फेरबदल केलेल्या स्वरूपातच नियम अमलात येईल किंवा येणार नाही. तथापि, असे कोणतेही फेरबदल किंवा विलोपन यामुळे त्या नियमान्वये पूर्वी केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्राह्यतेस बाध येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.