साथरोग अधिनियम १८९७
१.(सन १८९७ चा अधिनियम क्रमांक ३)
(दिनांक १ मार्च १९८९ रोजी यथाविद्यमान)
(४ फेब्रुवारी १८९७)
घातक अशा साथरोगांच्या प्रसारास अधिक परिणामकारक रीतीने प्रतिबंध करण्यासाठी उपबंध करण्याबाबत अधिनियम.
ज्याअर्थी, घातक अशा साथरोगाच्या प्रसारास अधिक परिणामकारक रीतीने प्रतिबंध करण्यासाठी उपबंध करणे समयोचित आहे;
त्याअर्थी, याद्वारे पुढीलप्रमाणे अधिनियमित करण्यात येत आहे :-
कलम १ :
संक्षिप्त नाव आणि विस्तार :
१) या अधिनियमास साथरोग अधिनियम १८९७ असे म्हणता येईल.
२.(२) त्याचा विस्तार, ३.(दिनांक १ नोव्हेंबर १९५६ च्या लगतपूर्वी जी राज्यक्षेत्रे भाग ख राज्यात समाविष्ट होती ती राज्यक्षेत्रे) वगळून, संपूर्ण भारतावर आहे.)
४.(***)
-----------
१. हा अधिनियम
१) पंजाबला लागू करताना, साथरोग (पंजाब विशोधन) अधिनियम १९४४ (१९४४ चा पंजाब अधिनियम ३) याद्वारे; पूर्व पंजाबला लागू करताना १९४७ चा पूर्व पंजाब अधिनियम १ याद्वारे;
२) मध्यप्रांत आणि वऱ्हाडला लागू करताना मध्यप्रांत आणि वऱ्हाड साथरोग (विशोधन) अधिनियम १९४५ (१९४५ चा मध्यप्रांत आणि वऱ्हाड अधिनियम ४) याद्वारे विशोधित करण्यात आलेला आहे.
२. अनुकूलन आदेश १९५० द्वारे मूळ पोटकलम (२) ऐवजी हे पोटकलम दाखल करण्यात आले.
३. विधि अनुकूलन (क्रमांक २) आदेश १९५६ द्वारे (भाग क राज्ये) या मजकुराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
४. १९१४ चा अधिनियम १० कलम ३ व अनुसूची दोन यांद्वारे पोटकलम (२) च्या शेवटी असलेला (आणि) हा शब्द व पोटकलम (३) निरसित करण्यात आले.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.