साथरोग अधिनियम १८९७
कलम २क :
१.(केंद्र शासनाच्या शक्ती :
जेव्हा केंद्र शासनाची अशी खात्री झाली असेल की, भारतात किंवा त्याच्या कोणत्याही भागात कोणत्याही घातक अशा साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा असा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झालेला आहे, आणि त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचे सर्वसाधारण उपबंध हे अशा रोगाच्या प्रादुर्भावास किंवा त्याच्या प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने अपुरे आहेत, तेव्हा केंद्र शासनास, २.(या अधिनियमाचा ज्यांच्यावर विस्तार आहे अशा राज्यक्षेत्रांमधील) कोणत्याही बंदरातून निघणाऱ्या किंवा अशा बंदरात येणाऱ्या कोणत्याही जहाजाची किंवा जलयानाची तपासणी करण्यासाठी आणि आवश्यक असेल त्याप्रमाणे असे जहाज किंवा जलयान किंवा त्यातून जलप्रवासास निघणाऱ्या किंवा त्यातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तिला थांबवून ठेवण्यासाठी उपाययोजना करता येतील आणि निर्बंध विहित करता येतील.)
---------
१. अनुकूलन आदेश १९३७ द्वारे कलम २क ऐवजी हे कलम दाखल करण्यात आले, पूर्वीचे कलम २क हे १९२० चा अधिनियम ३८ कलम २ व अनुसूची एक यांद्वारे समाविष्ट करण्यात आले होते.
२. विधि अनुकूलन (क्रमांक २) आदेश १९५६ याद्वारे (भाग क राज्यातील किंवा भाग ग राज्यातील) या मजकुराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.