महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९
कलम २३.
अपराधाची दखल घेणे आणि अन्वेषण करणे :
१)संहितेत काहीही अंतर्भुत असले तरी-
क)या अधिनियमाखाली कोणताही संघटित गुन्हेगारीचा अपराध केल्याबाबतची कोणत्याही संघटित गुन्हेगारीचा अपराध केल्याबाबतची कोणत्याही माहितीची नोंद, पोलीस उप महानिरीक्षक यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या पूर्वमान्यतेशिवाय कोणताही पोलीस अधिकारी करणार नाही;
ख)या अधिनियमाच्या तरतुदीखालील कोणत्याही अपराधाचे अन्वेषण, पोलीस उपअधीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडून केले जाणार नाही.
२)विशेष न्यायालय, या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाची, पोलीस अपर महासंचालक यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा असलेल्या अधिकाऱ्याच्या पूर्वमान्यतेशिवाय दखल घेणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.