महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९
कलम २४.
कर्तव्ये पार पाडण्यात कसूर करणाऱ्या लोकसेवकांना शिक्षा :
कलम २ च्या खंड (ड (इंग्रजी ई) ) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणष संघटित गुन्हा करण्याच्या कामी लोकसेवक असणाऱ्या कोणीही, कोणत्याही स्वरूपाची कोणतीही मदत किंवा साह्य केले - मग ते संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्याने कोणताही अपराध करण्यापूर्वी असो, किंवा केल्यानंतर असो- किंवा या अधिनियमान्वये कायदेशीर उपाययोजना केली नाही किंवा या संदर्भात कोणत्याही न्यायालयाने किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे हेतुत: टाळले तर त्यास तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या कालावधीच्या दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारच्या कारावासाची आणि तसेच दंडाची शिक्षा होईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.