महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८
कलम ३१ :
नियम :
(१) राज्य शासनास शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणण्याच्या प्रयोजनांसाठी नियम करता येतील.
(२) विशेषत: व मागील तरतुदींच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, शासनास पुढील बाबतीत नियम करता येतील -
(एक) लायसन्सचा नमुना आणि कलम ७ अन्वये जी फी दिल्यानंतर ते देण्यात येईल ती फी आणि ज्या शर्तीस अधीन ठेवून ते देण्यात येईल त्या शर्ती;
(दोन) हिशेब ज्या रीतीने ठेवले पाहिजेत व ते बाळगले पाहिजेत ती रीत व कलम १४ अन्वये हिशेबाची विवरणपत्रे ज्या नमुन्यात व ज्या मुदतीत सादर करावयाची असतील तो नमुना व ती मुदत.
(३) या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमान्वये अशी तरतूद करण्याचा अधिकार आहे की, कोणत्याही अशा नियमाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती अपराधसिद्धीनंतर पन्नास रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाच्या शिक्षेस पात्र होईल.
(४) या कलमान्वये केलेले नियम आगाऊ प्रसिद्ध करण्याच्या शर्तीस अधीन असतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.