महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८
कलम ३२ :
व्यावृत्ती :
या अधिनियमातील कोणताही मजकूर -
(अ) मुंबईचा रेसकोर्सच्या जागांबद्दल लायसन्स देण्याबाबत अधिनियम, १९१२ (१९१२ चा मुंबई ३) याच्या कलम ४ अन्वये ज्याला शर्यतीच्या जागेवर घोड्यांच्या शर्यती लावण्यासाठी लायसन्स दिले असेल अशा कोणत्याही जागेच्या मालकास, ती पट्ट्याने घेणाराने अगर भोगवटा करणाराने लायसन्सात किंवा परवान्यात निर्दिष्ट केल्याप्रमाणे उक्त अधिनियमान्वये, टर्फ-कमिशन एजंदचा धंदा अगर व्यवसाय चालविता यावा म्हणून दिलेल्या लायसन्सान्वये किंवा परवान्यान्वये जी व्यक्ती बुक-मेकर अगर टर्फ-कमिशन एजंट म्हणून काम करते अशा कोणत्याही व्यक्तीस अगर अशा व्यक्तीने घेतलेल्या कोणत्याही पणाच्या अगर पैजेच्या पैशाबद्दल केलेल्या कोणत्याही नोंदीस;
(ब) केंद्र सरकारने किंवा राज्य शासनाने चालविलेल्या लॉटरीस;
(क) राज्य शासनाने विशेषरीत्या प्राधिकृत केलेल्या लॉटरीस;
लागू होणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.