महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
अनुसूची - ग :
(कलम १२९ आणि १३० पहा ) :
इमारतींच्या जागांबाबतचा सनदेचा नमुना
प्रति
------------------------------
ज्याअर्थी, जमीन महसुलाची व्यवस्था व्हावी म्हणून, आणि जमिनीशी संबंधित असलेले मालकी हक्क आणि इतर यांची नोंद होऊन ते जतन करण्यात यावेत म्हणून -------------- चे ------------ यातील जमिनीेचे भूमापन करण्याबद्दल, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ याच्या तरतुदींन्वये राज्य शासनाने निदेश दिला आहे आणि त्याबाबतीत जरूर असणारी चौकशी करण्याचा आदेश दिला आहे ; त्याअर्थी, ही सनद उक्त संहितेच्या कलम १२९ किंवा १३० अन्वये पुढीलप्रमाणे दिली आहे. म्हणजे --------------- च्या ------------------ विभागांतील जमिनीचा विवक्षित तुकडा तुमच्या भोगवटयात आहे व ----------------- क्रमांकाचा ताव म्हणून जो नकाशा आहे त्यात जमिनीच्या त्या तुकडयाच्या नोंदीचा क्रमांक -------------- आहे आणि ----------------- येथून --------------- पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर -------------- कडे त्याचे तोंड आहे व त्यांचे क्षेत्रफळ सुमारे ------------ चौरस मीटर आहे व त्याची आकृती व लांबी रूंदी पुढीलप्रमाणे आहे :-
उक्त भोगवटयाचा अधिकार तुमच्याकडे या अन्वये कायम केला आहे. त्यास सर्व जमीन महसुलाची माफी आहे. (किंवा तो जमीन महसुलाची वार्षिक --------------- रूपये रक्कम देण्याच्या अधीन आहे.)
तुमच्या धारणाधिकाराच्या शर्ती अशा आहेत की, भोगवटयाचा अधिकार हस्तांतरणयोग्य आणि अशा वंशपरंपरागत चालणारा आहे आणि उक्त भोगवटयाचा अधिकार त्याचा वेळोवेळी जो कोणी वैध धारक असेल अशा व्यक्तीच्या मालकी हक्काबाबत कोणतीहीी हरकत किंवा तक्रार न घेता, राज्य शासनाकडून चालू ठेवण्यात येईल . (फक्त महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, यांच्या किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही इतर कायद्याच्या तरतुदींनुसार वरीलप्रमाणे जमीन महसूलाचे वार्षिक प्रदान करण्याच्या शर्र्तींवर उक्त भोगवटयाचा अधिकार अदीन असेल आणि ------------------- पासून मोजण्यात आलेली --------------- वर्षांची मुदत संपल्यानंतर आकारणीच्या उक्त दराची फेरतपासणी करण्याच्या आणि त्यानंतर नेहमी ----------- वर्षाच्या लागोपाठच्या मुदतीने आकारणीची पुन्हा फेरतपासणी करण्याच्या दायित्वाच्या आणि उक्त आकारणी देण्याच्या वेळाबाबत आणि पध्दतीबाबत त्या त्या वेळी जो कायदा अंमलात असेल त्या कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी असणाऱ्या आवश्यकतेच्या अधीन असेल आणि कायद्यान्वये देणे आवश्यक असलेली उक्त आकारणी देण्यात तुम्ही कसूर कराल तर, उक्त भोगवटयाचा अधिकार आणि त्याच्याशी संबंधित असलेले सर्व हक्क आणि हितसंबंध, सरकारजमा होण्यास पात्र असतील. )
(सही)
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६अनुसूची-ग
#MLRCAct1966MarathischeduleC #scheduleCMLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.