महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
अनुसूची ङ :
(कलम २४७ पहा :
महसूल अधिकारी - अपील प्राधिकारी
१. उप विभागीय अधिकाऱ्याच्या हाताखालील, उप-विभागातील सर्व अधिकारी-
उप- विभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी याबाबतीत विनिर्दिष्ट करील असा सहायक जिल्हाधिकारी किंवा उप-जिल्हाधिकारी.
२.उप-विभागीय अधिकारी सहायक जिल्हाधिकरी किंवा उप-जिल्हाधिकारी -
जिल्हाधिकारी किंवा राज्य शासन याबाबतीत जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार ज्याच्याकडे निहित करील असा सहायक जिल्हाधिकारी किंवा उप-जिल्हाधिकारी.
३.जिल्हाधिकारी १.(मुंबईचा जिल्हाधिकारी धरून ) किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे अपिलीय अधिकार ज्याच्याकडे निहित करण्यात येतील असा सहायक /उप-जिल्हाधिकारी -
विभागीय आयुक्त
४)कलम २.(१५) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करणारी व्यक्ती -
राज्य शासन याबाबतीत विनिर्दिष्ट करील असा अधिकारी.
-----------
भूमापन अधिकारी - अपील प्राधिकारी
१.जिल्हा निरीक्षक, भूमि-अभिलेख ,भूमापन तहसीलदार आणि जिल्हा निरीक्षक, भूमिअभिलेख, यांच्या दर्जाहून वरच्या दर्जाचे नसतील असे इतर अधिकारी -
अधीक्षक, भूमि-अभिलेख किंवा राज्य शासन याबाबतीत विनिर्दिष्ट करील असे त्याच दर्जाचे इतर अधिकारी.
२.अधीक्षक, भूमि अभिलेख आणि त्याच दर्जाचे इतर अधिकारी -
संचालक, भूमि -अभिलेख किंवा राज्य शासन या बाबतीत ज्याचेकडे भूमि-अभिलेख संचालकाचे अधिकारी निहित करील असा भूमि-अभिलेख उप-संचालक.
३.जमाबंदी अधिकारी -
जमाबंदी आयुक्त.
------------
१.सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४७ याच्या कलम १२ अन्वये (तो मुंबईचा जिल्हाधिकारी नसेल ) या मजकुराऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
२.सन १९६८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३०, याच्या कलम ८ अन्वये १६ या आकडयाऐवजी हा आकडा दाखल करण्यात आला.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६अनुसूचीङ
#MLRCAct1966MarathischeduleE #scheduleEMLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.