महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४
कलम ५२ :
सन १९४७ चा अधिनियम क्रमांक २८ याच्या तरतुदींची व्यावृत्ती :
या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीमुळे, महाराष्ट्र कर्जदार शेतकरी साहाय्य अधिनियम (१९४७ चा २८) किंवा कर्जदार शेतकऱ्यांना साहाय्य देण्याबाबत अमलात असलेला तत्सम स्वरूपाचा कोणताही इतर कायदा याच्या तरतुदींना बाध येणार नाही आणि कोणतेही न्यायालय, ज्या कर्जाच्या बाबतीत उक्त अधिनियमान्वये किंवा, यथास्थिती, उक्त कायद्यान्वये कर्ज समयोजन कार्यवाही केली जाऊ शकते त्या कोणत्याही कर्जाच्या संबंधातील कोणताही दावा या अधिनियमान्वये विचारार्थ स्वीकारणार नाही किंवा या अधिनियमान्वये त्यासंबंधात कोणतीही कार्यवाही करणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.