महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४
कलम ५५ :
अडचणी दूर करण्याचा अधिकार :
(१) या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, राज्य शासनास, प्रसंगानुरूप, राजपत्रात आदेश प्रसिद्ध करून, अडचण दूर करण्याच्या प्रयोजनासाठी त्यास आवश्यक व इष्ट वाटेल अशी, या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसलेली कोणतीही गोष्ट करता येईल :
परंतु, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून दोन वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर असा कोणताही आदेश काढता येणार नाही.
(२) या पोट-कलमाखाली काढलेला प्रत्येक आदेश, तो काढण्यात आल्या नंतर शक्य तितक्या लवकर, राज्य विधान मंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.