महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१० (२०१० चा ११)
The Maharashtra Medicare Service Persons And Medicare Service Institutions (Prevention Of Violence And Damage Or Loss To Property) Act 2010 in Marathi
प्रस्तावना :
(मा.राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक २८ एप्रिल २०१० रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)
महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय सेवा व्यक्तींबाबत घडणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि वैद्यकीय सेवा-संस्थांच्या मालमत्तेची
हानी किंवा नुकसान होण्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच तत्संबंधित व तदानुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम.
ज्याअर्थी, राज्यामध्ये वैद्यकीय सेवा-व्यक्तींच्या जीविताला इजा किंवा धोका निर्माण करणाऱ्या आणि वैद्यकीय सेवा-संस्थांच्या मालमत्तेची हानी किंवा नुकसान करणाऱ्या हिंसक कृत्यांमध्ये वाढ झाली होती, त्यामुळे वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि व्यावसायिक यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता, परिणामी राज्यातील या सेवांमध्ये मोठा अडथळा होत होता;
आणि ज्याअर्थी, वैद्यकीय सेवा-व्यक्तींबाबत घडणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करणे आणि अशा हिंसाचारातून होणाऱ्या वैद्यकीय सेवा-संस्थांच्या मालमत्तेच्या हानीस किंवा नुकसानीस प्रतिबंध करणे आवश्यक झाले होते;
आणि ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते;
आणि ज्याअर्थी, उपरोक्त प्रयोजनांसाठी, आवश्यक व्हावे अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राज्यपालांनी, तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती, आणि म्हणून त्यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०१० रोजी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अध्यादेश, २०१० (२०१० चा महा. अध्या. १) प्रख्यापित केला होता;
आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रूपांतर करणे इष्ट आहे; त्याअर्थी भारतीय गणराज्याच्या एकसष्टाव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.