महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९५९
कलम २३ :
लायसेन्स रद्द करणे :
(१) विहित केलेल्या शर्तीस अधीन राहून, कलम २२ अन्वये देण्यात आलेले लायसेन्स मुख्य निरीक्षकास कोणत्याही वेळी रद्द करता येईल, आणि त्यानंतर सोडून देण्यात आलेल्या व्यक्तीस ज्या मुदतीपर्यंत त्यास अटकावून ठेवण्याचा आदेश दिला असेल ती मुदत संपेपर्यंत प्रमाणित संस्थेत अटकावून ठेवण्यात येईल.
(२) ह्या कलमाच्या प्रयोजनांकरिता मुख्य निरीक्षकास, सोडून दिलेल्या व्यक्ती आवश्यक असल्यास, अटक करविण्याचा व त्यास अटकावून ठेवण्याबाबतच्या आदेशाच्या एका प्रतीसह अगदी नजीकच्या आदान केंद्रात पाठविण्याचा अधिकार आहे, आणि त्यानंतर कलम २५, पोटकलम (१) चे उपबंध, शक्य असेल तेथवर लागू होतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.