महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास (विकृतिकरण) प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५
( सन १९९५ चा महा अधि ८ )
प्रस्तावना :
(मा. राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक २९ एप्रिल १९९५ राजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम)
मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याची आणि त्याच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबींची तरतूद करण्यासाठी अधिनियम.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवोन चालू नव्हते;
आणि ज्याअर्थी, जनतेला दृष्टिगोचर असतील अशा कोणत्याही मालमत्तेच्या किंवा जागेच्या विरूपणास प्रतिबंध करण्यासाठी तरतूद करण्याकरिता आणि त्याच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता, विशेष कायदा असावा म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्वरित कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांची खात्री झाली होती; आणि म्हणून त्यांनी, दिनांक १८ जानेवारी १९९५ रोजी महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अध्यादेश, १९९५ (१९९५ चा महा. अध्या. १) हा प्रस्थापित केला होता;
आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रूपांतर करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या सेहेचाळिसाव्या वर्षी, याद्वारे पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-
कलम १ :
संक्षिप्त नाव व प्रारंभ :
(१) या अधिनियमास, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम, १९९५ असे म्हणावे.
(२) तो दिनांक १८ जानेवारी १९९५ रोजी अमलात आला असल्याचे मानण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.