महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास (विकृतिकरण) प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५
कलम ३ :
विरूपणाबद्दल शास्ती :
जो कोणी स्वत: किंवा कोणत्याही अन्य व्यक्तीच्या मार्फत जनतेला दृष्टिगोचर असेल अशा कोणत्याही जागेचे विरूपण करील त्यास अपराधसिद्धीनंतर, तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या कालावधीच्या कारावासाची किंवा दोन हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा किंवा या दोन्ही शिक्षा होतील :
परंतु, या कलमातील कोणतीही गोष्ट जी जाहिरात, -
(एक) या बाबतीत अशा क्षेत्रावर अधिकारिता असणाऱ्या स्थानिक प्राधिकरणाच्या लेखी परवानगीने प्रदर्शित केलेली असेल;
(दोन) कोणत्याही इमारतीमध्ये चालविला जाणारा व्यापार, व्यवसाय किंवा धंदा यांच्या संबंधातील असेल व ती त्या इमारतीच्या खिडकीमध्ये प्रदर्शित केलेली असेल; किंवा
(तीन) जिच्यामध्ये किंवा जीवर अशी जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली असेल त्या जमिनीमध्ये किंवा इमारतीमध्ये चालविला जाणारा व्यापार, व्यवसाय किंवा धंदा याच्याशी किंवा अशी जमीन किंवा इमारत किंवा त्यातील कोणत्याही चीजवस्तू कोणत्याही प्रकारे विकण्याशी किंवा भाड्याने देण्याशी किंवा तिच्यामध्ये अथवा तीवर किंवा तीमध्ये करण्यात येणारी कोणतीही विक्री, करमणूक किंवा सभा याच्याशी संबंधित असेल; किंवा
(चार) जिच्यामध्ये किंवा जीवर जाहिरात प्रदर्शित केलेली असेल अशा जमिनीच्या किंवा इमारतीच्या नावाशी अथवा अशा जमिनीच्या किंवा इमारतीच्या मालकाच्या किंवा भोगवटादाराच्या नावाशी संबंधित असेल; किंवा
(पाच) रेल्वे प्रशासनाच्या कामकाजाशी संबंधित असेल आणि ती कोणत्याही रेल्वे स्टेशनाच्या आतमध्ये किंवा रेल्वे प्रशासनाच्या कोणत्याही qभतीवर किंवा अन्य मालमत्तेवर प्रदर्शित केलेली असेल;
अशा जाहिरातीला लागू होणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.