महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७
कलम ७ :
सार्वजनिक जुगार अड्डा ठेवण्याचा किंवा त्यामध्ये जुगार खेळण्याचा संभवनीय पुरावा :
कलम ६ अन्वये प्रवेश केलेल्या कोणत्याही घरात खोलीत किंवा जागेत किंवा तेथे सापडलेल्या कोणत्याही इसमाजवळ जेंव्हा कोणतेही जुगार खेळण्याचे साधन जप्त करण्यात आले असेल आणि अशा प्रकारे जप्त करण्यात आलेल्या इतर कोणत्याही बाबतीत जर न्यायालयाची खात्री झाली की ज्या पोलीस अधिकाऱ्याने अशा घर, खोली किंवा जागेत प्रवेश केला त्यास अशा प्रकारे जप्त केलेली वस्तू ही जुगाराचे साधन आहे असा संशय घेण्यास वाजवी कारण होते तर अशा साधन किंवा वस्तूची जप्ती जोपर्यंत तद्विरूद्ध शाबित केले जात नाही तो पर्यंत असे घर खोली, किंवा जागा ही जुगाराचा सार्वजनिक अड्डा आणि तेथे आढळून आलेल्या व्यक्ती ह्या जुगार खेळण्याच्या हेतूने उपस्थित होत्या मग दंडाधिकाऱ्याने किंवा पोलीस अधिकाऱ्याने किंवा त्यांच्यापैकी कुणाही एकाच्या आदेशा अंतर्गत काम करणाऱ्या व्यक्तीने जुगार खेळतांना पाहिले नसले तरी पुरावा राहील.
अशी तरतूद करण्यात येते की, ज्या अधिपत्रावरून किंवा त्याच्या अनुरोधाने कलम ६ अन्वये घरात खोलीत किंवा जागेत प्रवेश केला असेल त्या अधिपत्रात कोणताही दोष असला तरी, न्यायालयाच्या मते असा दोष हा महत्त्वाचा नसल्यास उपरनिर्दिष्ठ संभव काढण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.