महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९
कलम १३ :
अपराधांच्या बाबतीत विशेषित न्यायालयाची कार्यपद्धती व अधिकार :
(१) आरोपीला न्यायचौकशीसाठी विशेषित न्यायालयाकडे सुपूर्द केले नसतानाही, विशेषित न्यायालय अपराधाची दखल घेऊ शकेल आणि आरोपी व्यक्तीची न्यायचौकशी करताना, दंडाधिकाऱ्यांकरवी वॉरंट खटल्यांच्या न्यायचौकशीकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) मध्ये विहित केलेली कार्यपद्धती अनुसरील.
(२) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) च्या तरतुदी, विशेषित न्यायालयासमोर चाललेल्या कार्यवाहींस शक्य असेल तेथवर लागू होतील आणि उक्त तरतुदींच्या प्रयोजनाकरिता विशेषित न्यायालय हे दंडाधिकारी असल्याचे मानण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.