महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६
कलम १० :
अपील समितीकडे अपील करणे :
(१) कलम ६ अन्वये लायसन मंजूर करण्यासाठी नकार देणाऱ्या किंवा कलम ९ अन्वये कोणतेही लायसन निलंबित करणाऱ्या किंवा परत घेणाऱ्या किंवा रद्द करणाऱ्या लायसन प्राधिकाऱ्याच्या कोणत्याही आदेशामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, विहित करण्यात येईल अशा कालावधीच्या आत विहित शुल्कासह अपील समितीकडे अपील करता येईल आणि अपील समिती, अशा अपिलावर विहित करण्यात येईल त्याप्रमाणे अशा कालावधीच्या आत तिला न्याय्य व योग्य वाटेल असा आदेश देईल.
(२) पोट-कलम (१) खाली दिलेला असा आदेश अंतिम असेल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.