महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६
कलम ११ :
पुनरीक्षण :
(१) राज्य शासनास, एकतर स्वत:हून किंवा व्यथित झालेल्या व्यक्तीने केलेल्या अर्जावरून विहित करण्यात येईल अशा कालावधीच्या आत या अधिनियमान्वये लायसन प्राधिकाऱ्याकडून दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अभिलेख मागविता येतील आणि त्यांची तपासणी करता येईल आणि त्याबाबतीत त्यास न्याय्य व योग्य वाटेल असा आदेश देता येईल :
परंतु, -
(एक) जेव्हा या कलमाखालील अर्ज राज्य शासनाकडून फेटाळण्यात येईल तेव्हा, अशा फेटाळण्याबद्दलची कारणे लेखी नमूद करील; आणि
(दोन) या कलमाखालील कोणताही आदेश पारित करण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला बाधा पोहचण्याचा संभव असेल त्या व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येईल :
परंतु आणखी असे की, जर कलम १० अन्वये दाखल केले असेल तर, या कलमान्वये पुनरीक्षण करण्यात येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.