महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९
(सन १९९९ चा ३३)
महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई करण्याकरिता अधिनियम.
ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्यात, शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग करण्यास मनाई करण्यासाठी एक विशेष कायदा अधिनियमित करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या पन्नासाव्या वर्षी याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-
कलम १ :
संक्षिप्त नाव व प्रारंभ :
(१) या अधिनियमास महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम, १९९९ म्हणावे.
(२) तो, राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनांद्वारे नेमून देईल अशा दिनांकास अमलात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.