महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१
कलम २२ :
विवक्षित प्रकरणी इतर कायद्यांखालील अधिकार व विशेषाधिकार यांवर परिणाम न होणे :
या अधिनियमातील कोणत्याही मजकुरामुळे, कोणत्याही कारखान्यात किंवा आस्थापनेत काम करणाऱ्या कोणत्याही नोंदलेल्या सुरक्षा रक्षकास हा अधिनियम अमलात येईल त्या तारखेस, इतर कोणताही कायदा, करार, रुढी किंवा परिपाठ याअन्वये जे कोणतेही अधिकार किंवा विशेषाधिकार मिळण्याचा हक्क असेल त्या अधिकारांवर किंवा विशेषाधिकारांवर जर असे अधिकार किंवा विशेषाधिकार हे या अधिनियमान्वये आणि योजने अन्वये त्यास जे मिळण्याचा हक्क प्राप्त होईल अशा अधिकारांपेक्षा किंवा विशेषाधिकारांपेक्षा जास्त फायदेशीर असतील तर, परिणाम होणार नाही :
परंतु अशा सुरक्षा रक्षकास या अधिनियमाच्या उपबंधान्वयेचा व योजनेअन्वयेचा कोणताही तत्सम फायदा मिळऱ्याचा हक्क असणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.