महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१
कलम २४ :
मंडळाच्या कामकाजाबाबत चौकशी :
१) राज्य शासनास, कोणत्याही मंडळाच्या किंवा योजनेच्या कामकाजाची तपासणी किंवा चौकशी करण्यासाठी, आणि त्या बाबतीत राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीची, कोणत्याही वळी, नेमणूक करता येईल.
२) तपासणीचे किंवा चौकशीचे काम योग्य प्रकारे करणे शक्य व्हावे म्हणून, अशा रीतीने नेमण्यात आलेल्या व्यक्तीस, मंडळ, सर्व सोयी उपलब्ध करुन देईल आणि तिला आवश्यक असतील अशी मंडळाच्या ताब्यातील कागदपत्रे, लेखे किंवा माहिती पुरवील.
३) कोणत्याही मंडळाच्या किंवा योजनेच्या कामकाजाची तपासणी किंवा चौकशी करण्यासाठी अशा रीतीने नेमलेल्या कोणत्याही व्यक्तीस, या अधिनियमान्वये नेमलेल्या निरीक्षकाच्या सर्व अधिकारांचा वापर करता येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.