महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१
कलम ३१ :
सन १९८१ चा महा. अध्यादेश क्र. ५ याचे निरसन व व्यावृत्ती :
१) महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अध्यादेश १९८१ (१९८१ चा महा अध्या. ५) हा याद्वारे निरसित करण्यात येत आहे.
२) अशा रीतीने निरसन करण्यात आले असेल तरी, उक्त अध्यादेशान्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा कारवाई ही (काढलेली कोणतीही अधिसूचना, केलेले कोणतेही नियम, योजना किंवा कोणताही आदेश धरुन ) या अधिनियमाच्या संबंधित उपबंधान्वये यथास्थिती केलेली, काढलेली किंवा तयार केली असल्याचे मानण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.