मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १८२
लायसनासंबंधीचे अपराध :
१) जो कोणी चालकाचे लायसन बाळगण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी या अधिनियमाखाली अपात्र ठरलेला असताना एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी मोटार वाहन चालवील, किंवा चालकाच्या लायसनासाठी अर्ज करील किंवा ते मिळवील किंवा कोणताही शेरा नसलेले चालकाचे लायसन त्याला दिले जाण्यास तो हक्कदार नसताना, त्याने पुर्वी बाळगलेल्या चालकाच्या लायसनवर असलेला शेरा उघड न करता चालकाचे लायसन मिळण्यसाठी अर्ज करील किंवा ते मिळवील त्याला तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किवा पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील आणि त्याने अशा रीतीने मिळविलेले चालकाचे कोणतेही लायसन मुळीच परिणामकारक असणार नाही.
२) वाहकाचे लायसन बाळगण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी या अधिनियमाखाली अपात्र ठरलेला असताना जो कोणी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी टप्पा वाहनाच्या लायसनासाठी अर्ज करील किंवा ते मिळवील किंवा कोणताही शेरा नसलेले वाहकाचे लायसन त्याला दिले जाण्यास तो हक्कदार नसताना त्याने पूर्वी बाळगलेल्या वाहकाच्या लायसनवर असलेला शेरा उघड न करता वाहकाच्या लायसनसाठी अर्ज करील किंवा ते मिळवील त्याला एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या तुरूंगवासाची किंवा शंभर रूपयांपर्यंत आणि त्याने अशा रीतीने मिळविलेले वाहकाचे कोणतेही लायसन मुळीच परिणामकारक असणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.