गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ८२
निरसन व व्यावृत्ती :
१) अफू अधि. १८५७ (१८५७ चा १३), अफू अधि. १८७८ (१८७८ चा १) आणि घातक औषधी द्रव्ये अधि. १९३० (१९३० चा २) हे याद्वारे निरसित करण्यात येत आहेत.
२) असे निरसन झाले तरीही, पोटकलम (१) द्वारे निरसित करण्यात आलेल्या कोणत्याही अधिनियमितीअन्वये केलेली किंवा करण्याचे अभिप्रेत असलेली कोणतीही गोष्ट अथावा करण्यात आलेली किंवा करण्याचे अभिप्रेत असलेली कोणतीही कृती, ती या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसेल तेथवर, या अधिनियमाच्या तत्सम तरतुदींद्वारे करण्यात आल्याचे समजण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.