गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ८३
अडचणी दूर करण्याचा अधिकार :
१) या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उद्भवल्यास, केंद्र शासनाला, शासकीय राजपत्रात आदेश प्रकाशित करून ती अडचण दूर करण्यासांी आवश्यक किंवा योग्य वाटतील असे, या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करता येतील;
परंतु या अधिनियमाला राष्ट्रपतींची अनुमती मिळाली असेल त्या दिनांकापासून तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर असा कोणताही आदेश देता येणार नाही.
२) या कलमान्वये देण्यात आलेला प्रत्येक आदेश, तो देण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, संसदेच्या सभागृहांसमोर मांडण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.