गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम १९८५
नियम ६२
पाठविलेल्या मालाचे अपवाहन :
१) उपरोक्त निर्यात प्राधिकारपत्रामध्ये दिलेल्या नावाशिवाय अन्य ठिकाणी आ पाठविलेल्या मालाचे अपवाहन करण्यास प्रतिबंध घालण्यासाठी, कस्टम कलेक्टर, सर्व यथोचित उपाययोजना हाती घेईल.
२) अ) नियम ५८ अन्वये तरतूद केल्याप्रमाणे प्राधिकारपत्र देणाऱ्या प्राधिकाऱ्याने दिलेले निर्यात प्राधिकारपत्र हजर करण्याच्या अधीन राहून, जणू काही असे अपवाहन भारतातून नवीन ठिकाणच्या देशास किंवा राज्यक्षेत्रास करण्यात आले होते असे समजून, कस्टम कलेक्टर, सोबत असलेल्या प्राधिकारपत्राच्या प्रतीमध्ये दिलेल्या नावाशिवाय अन्य देशास, अशा पाठविलेल्या मालाचे अपवाहन करण्यास परवानगी देऊ शकेल.
ब) कस्टम कलेक्टर, खंड (अ) अन्वये ज्याचे अपवाहन करण्यास मान्यता दिलेली होती, अशा पाठविलेल्या मालाचे अपवाहन केल्यावर गुंगीकारक औषधिद्रव्याच्या किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या वास्तविक प्रमाणासंबंधी प्राधिकारपत्र देणाऱ्या प्राधिकाऱ्यास माहिती देईल, त्यानंतर प्राधिकारपत्र देणारा प्राधिकारी, पाठविलेल्या मालाची निर्यात ज्या देशातून केली जाते त्या देशास माहिती देईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.