पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७
कलम २३ :
हा अधिनियम काही विवक्षित अधिनियमितीच्या व्यतिरिक्त असणे :
या अधिनियमाचे उपबंध हे, पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम, १९२० (१९२० चा ३४), उत्प्रवासन अधिनियम, १९८३ (१९८३ चा ३१), विदेशी व्यक्तींची नोंदणी अधिनियम, १९३९ (१९३९ चा १६), विदेशी व्यक्तींबाबत अधिनियम, १९४६ (१९४६ चा ३१), शत्रूशी व्यापार (आणीबाणीचे उपबंध चालू ठेवणे) अधिनियम, १९४७ (१९४७ चा १६), विदेशी व्यक्तीविषयक विधी (लागू करणे आणि विशोधन) अधिनियम, १९६२ (१९६२ चा ४२), विदेशी विनियम चलन विनियमन अधिनियम, १९७३ (१९७३ चा ४६) आणि विदेशी व्यक्ती व विदेशी विनियमन चलन यांच्याशी संबंधित असलेल्या इतर अधिनियमिती यांच्या उपबंधांच्या व्यतिरिक्त असतील, त्यास न्यूनकारी असणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.