सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमामध्ये, संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नेसल तर,-
(क) आगळीक या शब्दास, भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) याच्या कलम ४२५ मध्ये नेमून दिलेल्या अर्थाप्रमाणे अर्थ असेल;
(ख) सार्वजनिक संपत्ती याचा अर्थ, पुढीलपैकी कोणाच्याही मालकीची असेल किंवा ताब्यात असेल किंवा नियंत्रणाखाली असेल अशी कोणतीही सार्वजनिक, - मग ती स्थावर किंवा जंगम असो - (कोणत्याही यंत्रसामग्रीसह) संपत्ती, असा आहे :-
(एक) केंद्र शासन; किंवा
(दोन) कोणतेही राज्य शासन;
(तीन) कोणतेही स्थानिक प्राधिकरण; किंवा
(चार) केंद्रीय, प्रांतीय किंवा राज्य अधिनियमाद्वारे तदन्वये स्थापित झालेला कोणताही निगम;
(पाच) कंपनी अधिनियम, १९५६ याच्या कलम ६१७ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे असणारी कोणतीही कंपनी; किंवा
(सहा) केंद्र शासनाला याबाबतीत शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करता येईल अशी कोणतीही संस्था, परिसंस्था किंवा कोणताही उपक्रम :
परंतु, अशा संस्थांना, परिसंस्थांना किंवा उपक्रमांना, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे केंद्र शासनाकडून किंवा एका किंवा अधिक राज्य शासनांकडून पूर्णपणे किंवा भरीवपणे किंवा केंद्र शासनाकडून अंशत: व एका किंवा अधिक राज्य शासनांकडून अंशत: निधीद्वारे भांडवल पुरवण्यात येत असल्याशिवाय केंद्र शासनास या उपखंडान्वये कोणतीही संस्था, परिसंस्था, किंवा उपक्रम विनिर्दिष्ट करता येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.