पोलीस दल (हक्कांवर निर्बंध) अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा ३३) (२ डिसेंबर, १९६६)
प्रस्तावना :
* भारत सरकार, राजपत्र असाधारण दिनांक २ डिसेंबर १९६६ भाग दोन विभाग एक मध्ये प्रसिद्ध केला.
कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रभार असलेल्या दलांच्या सदस्यांनी त्यांची कर्तव्ये योग्यप्रकारे पार पाडण्याची व त्यांच्यामध्ये शिस्त राखण्याची सुनिश्चिती करण्यासंबंधी संविधानाच्या भाग तीनद्वारे प्रदान केलेले हक्क त्यांना लागू असताना काही हक्कांवर निर्बंध घालण्यासाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम.
तो, भारतीय गणराज्याच्या सतराव्या वर्षी संसदेद्वारे पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
कलम १ :
संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :
(१) या अधिनियमास पोलीस दल (हक्कांवर निर्बंध) अधिनियम, १९६६ असे म्हणावे.
(२) तो संपूर्ण भारतभर लागू असेल.
(३) तो, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे याबाबतीत नियम करण्यात येईल, अशा तारखेस अमलात येईल.
(अ) एखाद्या केंद्रशासित प्रदेशामध्ये, भारत सरकारद्वारे; आणि
(ब) राज्यामध्ये, त्या राज्य शासनाद्वारे;
परंतु, विविध केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्र सरकारद्वारे विविध तारखा नेमून देण्यात येतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.